ॲड. शिवसांब चवंडा यांचे दुखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : अहमदपूर येथील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या विचार विकास मंडळाचे उपाध्यक्ष, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती चे अध्यक्ष ॲड. शिवसांब शिवराजआप्पा चवंडा यांचे दि. 26 रोज सोमवारी रात्री एक वाजता अल्पशा आजाराने वयाच्या8 1 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दि. 26 रोजी लिंगायत स्मशानभूमीमध्ये दुपारी अडीच वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी लातूर केमिस्ट आणि ड्रगिस्ट चे सचिव नागेश स्वामी, यशवंत परिवाराच्या वतीने रामलिंग तत्तापुरे, नांदेडचे डॉ. हंसराज वैद्य, विचार विकास मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट किशनराव बेंडकुळे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती चंद्रकांत मध्ये, माजी कृषी सभापती ॲड. टी. एन. कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एडवोकेट संभाजीराव पाटील, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव तथा माजी आ. ईश्वरराव भुशीकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, आ. बाबासाहेब पाटील यांचे एडवोकेट शिवसांब चवंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी श्रद्धांजलीपर भाषण झाले. कैलास वाशी शिवसांब चवंडा हे अहमदपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक ,बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, शहरातील शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचा अनमोल वाटा होता. त्यांच्या पक्षात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातू ,पणतू असा मोठा परिवार असून प्रसाद गार्डन चे मालक तथा उद्योजक शरण शिवसांब चवंडा यांचे ते वडील, रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई चवंडा यांचे ते पती होत होत. अंत्यविधीला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर व महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.