माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा पाटील परिवारांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांची पगडी, तुलसीहार विठ्ठलाची मूर्ती देऊन केला सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा पाटील परिवारांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांची पगडी, तुलसीहार विठ्ठलाची मूर्ती देऊन केला सत्कार

आशियाना निवासस्थानी जिल्ह्यातील लोकांची सत्कारासाठी गर्दी

लातूर (प्रतिनिधी) : मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांना देश पातळीवरील सहकारातील मार्गदर्शक हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे विठ्ठल अशी ओळख असलेल्या व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे तारणहार असलेले विकासपुरुष राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून सर्व परिचित आहेत त्यांना नुकताच संगमनेर येथील स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात संस्थेचा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते सहकारातील नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल आशियाना येथे सोमवारी त्यांचा रेणापूर येथील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोविंद दिलिप पाटील यांनी संत तुकाराम महाराज महाराज यांची पगडी तुलसी हार व विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला दरम्यान संत तुकाराम महाराज यांची पगडी तुळशीचा हार विठ्ठलाची मूर्ती देवुन सत्कार केल्याने दिलीपराव देशमुख साहेब लातूरकरांचे विठ्ठल अशी चर्चा सुरु झाली आहे.

यावेळी माजी आमदार अँड त्रिंबक जी भिसे, रेणापूर येथील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोविंद दिलीप पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीन अलीसय्यद गणेश कलाल ,भूषण पनुरे, सिद्धार्थ चव्हाण, अजय चक्रे, राजू माने, धनाजी भामरे, अतुल कातळे दयानंद राठोड गणेश तावरे, गोविंद आडे, राज मस्के वय सोमानी तानाजी सूर्यवंशी, सतीश पाटील आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

About The Author