उद्धव ठाकरेंचे हात बळकट करा – चंद्रकांत खैरे
उदगीर (एल. पी. उगिले) : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकनिष्ठ राहून, शिवसेनेला अधिकाधिक बळ द्यावे. असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले.
ते उदगीर येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. याप्रसंगी प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उदगीर येथील भगीरथी मंगल कार्यालयामध्ये सदरील मेळावा संपन्न झाला.
आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यामध्ये प्राधान्याने नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज होऊन राजकीय नीती अवलंबून साम, दाम, दंड, भेद यासाठी सज्ज राहावे. असे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी युवा सेना विस्तारक विपुल पिंगळे, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, वीरभद्र गादगे संभाजीनगरचे नगरसेवक, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी लक्ष्मण पेठकर ,महिला आघाडी जिल्हा संघटक सुनिता चाळक, डॉक्टर शोभाताई बेंजर्गे ,माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, ग्रामीण भागातील सर्व उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे, अंगद पवार, सचिन दाने, भरत सांगवीकर तसेच उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, एडवोकेट प्रवीण मगर, संग्राम टाले, आहे हरिभाऊ साबदे, गुणवंत पाटील ,तालुका संघटक संतोष रोडगे, अरुण बिरादार, गोविंद कोंपले, पंचायत समितीचे माजी सदस्य मनोज बोधले, सचिन साबणे, अंकुश कोनाळे, शिवकांत चटनाले, कैलास पाटील, अनिल पंचाक्षरी, मुन्ना पांचाळ, संजय मठपती, विष्णू चिंतलवार, व्यंकट साबणे, महिला आघाडीच्या अरुणाताई लेंडाने, सर्व तालुका उपप्रमुख रामदास काकडे, मनोज पाटील, बाळू वडले, प्रदीप पाटील मोरतळवाडीकर, शाम तवर, तातेराव जाधव, लखन घोणसे, अविनाश राठोड, रमेश वाघमारे, शिवराम तेलंगे, हनुमंत इंगलवार, माधव मोहटे बोरगाव, नवनाथ गायकवाड, प्रदीप गायकवाड, श्रीरंग गायकवाड, बालाजी पुरी, प्रदीप पाटील लिमगाव, दत्ता विठ्ठल मोरतळे, ऋषिकेश नामदेव मोरे, विशाल भरत मोरतळे, संगमेश्वर बिरादार, पवन मोरे, पवन घोरपडे, रंजीत बिरादार, निखिल चिंचोले, अभिजीत चव्हाण, चैतन्य शिंदे ,गुणवंत बिरगे, रमाकांत मदने, माणिक प्रभू जळकोटे, वैजनाथ जळकोटे, सिताराम सोनकांबळे, ज्ञानेश्वर बिरादार, गुलाब बिरादार, ज्ञानेश्वर शिंदे, बाबू भारती सुकणी, जयपाल चव्हाण संदीप हंडारगे अमोल मस्के विशाल काळे, सचिन बिरादार, संजय डोंगरगाव, थोरे दीपा, थोरे प्रीती ,अनिता कांबळे, मांजरे कमलाबाई ,उषाबाई धुळे, शिवनंदा कदम, प्रजा सूर्यवंशी ,हिरा सूर्यवंशी, वाघमारे भारतबाई, पांढरे शिवनंदा, कांबळे आशाबाई, कांबळे अनुसया, कल्पना, महानंदा त्रिवेलाबाई सखुबाई सूर्यवंशी जाधव आशा, सुमन, शीतल, चंद्रभागा, कल्पना, सीमा, महादेव जाधव, कोमल भोसले, लक्ष्मीबाई सूर्यवंशी, जयश्री, रीमा, सुशिलाबाई गायकवाड, अर्चना शिंदे, जयश्री थोरे, माधवी गायकवाड, अर्चना उले इत्यादी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अभंगे फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत जाधव शेल्हळकर आणि त्यांच्यासोबत पंधरा मुस्लिम युवकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अशी माहिती शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी दिली.