अमानत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अमानत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील अमानत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड उदगीर या सहकारी संस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. उदगीर येथील दख्खन विद्यालयाच्या प्रांगणात सदरील सभा संपन्न झाली. ही सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष उस्ताद सय्यद महमूद यांच्या अध्यक्षतेखाली व मौलाना हम्माद कुरेशी तसेच शिक्षक कासिम उल उलूम, प्रा. अन्वर हुसेन अल अमीन उच्च माध्यमिक विद्यालय, मुक्ती रहमान सईद संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

मौलाना हम्माद खुरेशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे सांगितले की, अल्लाहाने (ईश्वर) व्यापाराला वैध केले पण व्याजाला निषिद्ध केले आहे. अल्लाह व्याजाचा ऱ्हास करतो, आणि व्यापार, दानधर्माची वाढ करतो. कोणत्याही कृतघ्न आणि वाईट आचरण करणाऱ्याला पसंत करत नाही.

प्रा.अन्वर हुसेन यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या काळात आपले स्वतःचे उद्योग कसे उभारता येतील? त्याचे उत्पादन व वितरण कसे करावे? याला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले. तर मुक्ती रहमान सय्यद यांनी माणसांनी समाज हितासाठी कार्य करीत असताना स्वतःच्या फायद्याचीच अपेक्षा करू नये, गरीब, गरजूंच्या हिताचा विचार करून त्यांना मदत कशी करता येईल असा विचार करावा, असे सांगितले.

या पतसंस्थेची विशेषता म्हणजे गेल्या तीन वर्षापासून विना व्याजाच्या तत्त्वावर चालविली जात असून उदगीर स्तरावर गरीब व गरजवंत लोकांना दहा हजार ते 40 हजारापर्यंत परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाते. या सर्वसाधारण सभेचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन हिसामुद्दीन संचालक तथा मुख्याध्यापक दक्कन प्राथमिक शाळा यांनी केले. गेल्या तीन वर्षाच्या कार्याचा अहवाल श्री गुलाम गौस खान सचिव यांनी सादर केला.

या सर्वसाधारण सभेचे संचालक प्रा जरगर सलीम अहमद , डॉक्टर शफी ,श्री बाबा खतीब, साबिरी सईद, मौलाना उस्मान सिद्दिकी, सोहेल फारुखी फहीम पतसंस्थेचे सभासद व उदगीर शहरातील लोकप्रिय व्यापारी फारुखी रफीउद्दिन, प्रा. महबूब साकिब, मुन्ना जहागीरदार , बडेघर मंजूर, जमहुर सिद्दिकी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

ही सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी शेख सुहेब मॅनेजर, अब्दुल मकसिद उस्ताद व इतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हाश्मी शकील संचालक यांनी केले.

About The Author