किल्लारीत धाडसी चोरी; सोन्याच्या दागदागिन्यांसह रोख रक्कम लंपास
किल्लारी (प्रतिनिधी) : दि. 30 सप्टेंबर च्या रात्री अज्ञात चोरट्याने किल्लारीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या घराचा कोंडा कापून कुलूप तोडून आत प्रवेश केला .कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले रोख ४० हजार रुपये व ३०ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन,१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, प्रत्येकी २५ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, ३० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या, ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके दोन जोड, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असे अंदाजे किंमत २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे दागिने, व ३०० ग्राम वजनाच्या चांदीच्या तीन वाट्या ५००० रुपये किंमतीचा मुद्देमाल १ ऑक्टोबर २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी किल्लारी पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नाेंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रदीप बिबिशन जगताप , यांच्या किल्लारी येथील घराची कोंडी तोडून कपाटाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घराची कडी काढून लॉकरमध्ये ठेवलेले रोख ४० हजार व २ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. रोख रक्कम व सोने असे दोन्ही मिळून २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला असून, याप्रकरणी प्रदीप जगताप यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजपूत करीत आहेत.