आधुनिक दुर्गे नी आपल्या कर्तुत्वासोबत आपले कुटुंब एक संघ ठेवावे : मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड

आधुनिक दुर्गे नी आपल्या कर्तुत्वासोबत आपले कुटुंब एक संघ ठेवावे : मा.खा.डॉ.सुनील बळीराम गायकवाड

पुणे (प्रतिनिधी) : पुणे येथे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर स्मारक सभागृहा मधे वृदावन फूड्स आणि कृषीकिंग फार्मर फाउंडेश
यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र मोहत्सवा निमित्य आधुनिक दुर्गा पुरस्कार ९ आधुनिक दुर्गा ला देण्यात आला. विविध क्षेत्रातील अदभुत कार्य करणाऱ्या महिलाना पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला. लातूर चे लोकप्रिय संसदरत्न माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या हस्ते नऊ आधुनिक दुर्गा चा गौरव सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देउन करण्यात आला.त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ सुनील गायकवाड म्हणाले की आधुनिक दुर्गा या प्प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत. आपले कर्तुत्व सिध्द करताना आपले परिवाराला एक संघ ठेवन्याचे काम ही आधुनिक दुर्गे नी केले पाहीजे,कुटुंबाला एक संघ ठेऊन आपल्या आई वडील सासू साऱ्यांची सेवा केली पाहीजे तरच खऱ्या आधुनिक दुर्गा म्हणता येईल असे मत व्यक्त केले.प्रामुख्याने झी टीवी अँकर पत्रकार स्वाती गोडसे,अनिता केंद्रे, नासीफा कोतवाल,भाग्यश्री बिले,यांना आधुनिक दुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुपमा पवार उपआयुक्त कौष्यल्य विकास,रोजगार व उद्योजकता,महाराष्ट्र शासन, प्रतिभा देशमुख, हंमतराव चिकने,फुलचंद नागटिळक,मनोज भालेराव,स्वप्नील देशमुख, सिद्धेश्वर माने,कार्यक्रमाचे सुत्र संचलन आणि संयोजन सचिन पाटील यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!