महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सत्यशोधक व्याख्यानमाला संपन्न
उदगीर(एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये दीडशे ठिकाणी सत्यशोधक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या आहेत, त्याची सुरुवात या महाविद्यालयात झाली. वक्ते सेवानिवृत्त मराठवाडा विभाग साखर संचालक के. ई.हरिदास होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य प्रा. मनोहर पटवारी होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. आर.के.मस्के, उपप्राचार्य सी.एम.भद्रे ,पर्यवेक्षक प्रा.जे.आर.कांदे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते गुरुनाथ जमालपुरे, डॉ.प्राची हरिदास , डॉ.अलका भंडारे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना हरिदास म्हणाले महात्मा फुले यांनी व्यक्तीच्या विकासासाठी शिक्षणाशिवाय तरनोउपाय नाही म्हणूनशैक्षणिककार्यास सुरुवात केली, समाजात बुद्धिवादी व विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले , फुलेंनी ज्ञान घेऊन डोळसपणे पाहण्याचे आवाहन केले तसेच सत्य हे सर्वश्रेष्ठ असल्याचे समाजास संगितले. महात्मा फुलेंनी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला. पुढे बोलताना ते म्हणाले की सत्यशोधक समाजाचे देशाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. समारोपात प्रा.पटवारी म्हणाले महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे पुरोगामी विचारसरणी मानणारे असून या महाविद्यालयात माणुसकी जपण्याचे व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे कार्य केले जाते. मनुष्य जात ,धर्म यापेक्षा गुण आणि कर्माने मोठा होतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.आर.के.मस्के यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.प्रसाद जालनापुरकर यांनी केले तर आभार प्रा.प्रवीण जाहुरे यांनी मानले