राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे जी.श्रीकांत यांच्याहस्ते उद्घाटन

राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे जी.श्रीकांत यांच्याहस्ते उद्घाटन

लातूर (प्रतिनिधी) : अजीत प्रिमिअर लिग-2020 या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 21 ते 26 डिसेंबर या कालावधीत होत आहेत. या स्पर्धेचे आयोजन अराईज अकॅडमी,लातूरच्यावतीने करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हाधिकारी तथा बियाणे महामंडळ अकोल्याचे संचालक जी.श्रीकांत यांच्याहस्ते दयानंद क्रिकेट स्टेडीयमवर करण्यात आले. यावेळी झालेल्या डी.एम.एस.के विरूध्द एस.के.हिटर यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात एस.के हिटर या टीमने विजय मिळविला. यामध्ये सामनावीर म्हणून महम्मद शेख याला 1 हजार रू रोख व चषक देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, मे.प्रगती कन्स्ट्रक्शन,लातूरचे कार्यकारी संचालक कपीलभैय्या माकणे, अराईज अकॅडमीचे संचालक रंणजितसिंह पाटील कव्हेकर यांच्यासह क्रिकेट खेळाडूंची उपस्थिती होती. या क्रिकेट स्पर्धा 21 ते 26 डिसेंबर या कालावधीत सुरू राहणार असून या स्पर्धेत विजयी होणार्‍या टीमला प्रथम पारितोषिक 1 लक्ष रूपये, द्वितीय पारितोषीक 50 हजार रूपये व तृतीय पारितोषिक 11 हजार रूपये ठेवण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्यातील नामांकित संघाने भाग घेतला असून यामध्ये 21 डिसेंबर रोजी डी.एम.एस.के विरूध्द एस.के हीटर यांच्या झालेल्या सामन्यामध्ये एस.के हिटर या टीमने विजय मिळविला. यामध्ये सामनावीर म्हणून महम्मद शेख याला 1 हजार रूपये रोख व चषक देवून सन्मानित करण्यात आले. तर पाटील वारियर्स विरूध्द श्रीकांत सी.ए. यांच्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीकांत क्रिकेट अकॅडमीने विजय मिळविला. तर सामनावीर म्हणून शुभम हरपाळे याला 1 हजार रूपये व चषक देवून सन्मानीत करण्यात आले. 22 डिसेंबर रोजी बी.एम.सी. विरूध्द डी.सी.सी. यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात डी.सी.सी.च्या टीमने विजय संपादन केला. यामध्ये सामनावीर म्हणून अमर जाधव याला 1 हजार रूपये रोख व चषक देवून सन्मानित करण्यात आले. तर बी.एच.पी. विरूध्द एस.पी.एल. यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात एस.पी.एल.टीमने विजय मिळविला. तर सामनावीर म्हणून बोळंगे सर यांना 1 हजार रूपये रोख व चषक देवून सन्मानीत करण्यात आलेे. यावेळी खेळाडू व क्रिकेट प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

About The Author