उत्कृष्ट समाज निर्मितीसाठी संतांचे विचार महत्वाचे – राहुल केंद्रे
उदगीर (एल.पी.उगिले) : समाजात चांगुलपणा निर्माण करून सदविचारीसमाज निर्माण करावयाचा असल्यास संतांचे विचार महत्वाचे आहेत, असे विचार एकुरका रोड येथील ह.भ.प. वैकुंठवासी केशव महाराज आणि उत्तम महाराज यांच्या स्मरणार्थ हरिनाम सप्ताह निनित्य बोलताना लातूर जिल्ला परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आयोजित हरिनाम सप्ताहनिमित्य बोलताना पुढे म्हणाले की, भक्ती संप्रदायाची वाटचाल हजारो वर्षाच असून सर्व संतांनी समाजनिर्मिती साठी पर्यायाने राष्ट्र निर्मितीसाठी वेळो वेळी समाज सदविचारी आणि बळकट करण्यासाठी विचार मांडला आहे.
हा सांप्रदायिक विचार ह भ प ज्ञानेश्वर महाराज एकुरकेकर यांनी गेल्या तीन पिढ्यापासून टिकवून ठेवत महाराष्ट्र-आंध्र-तेलंगाणा-कर्नाटक भागातून ह भ प ज्ञानेश्वर महाराज यांचे आजोबा आणि वडील वैकुंठवासी केशव महाराज आणि ह भ प उत्तम महाराज यांचा भक्ती संप्रदायातील सर्व भक्त जण बंधू बघिनीं आज हरिनाम सप्ताहनिमित्ये उपस्थित होते.
या प्रसंगी भा ज पा चे लातूर जिल्ह्या उपाध्यक्ष संजय मामा पाटील, एकुरक्याचे माजी सरपंच जगदीश जाधव, माजी गटविकास अधिकारी विनायक पाटील, पप्पू पाटील, ज्ञानेश्वर महाराज तथा गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
