आरोग्य आणि भविष्याच्या दृष्टीने प्राणायामाचे रहस्य स्विकारणे आवश्यक – श्रीनिवास पटवारी
उदगीर (एल.पी. उगिले) : धावपळीच्या जीवनात भौतिक सुखाच्या शोधात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. आपले आरोग्य आणि भविष्याच्या दृष्टीने प्राणायामाचे रहस्य समजून घेउन त्याचा स्विकार करणे आवश्यक आहे, असे मत श्रीनिवास पटवारी यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी अंतर्गत योगाचार्य रामचंद्र गरड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 274 व्या वाचक संवाद मध्ये श्रीनिवास पटवारी यांनी स्वामी रामदेव लिखित प्राणायाम रहस्य या साहित्यकृतींवर संवाद साधताना पुढे म्हणाले की, प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार असून प्रत्येकाचे यम, नियम सांगत त्याच्या कृती करत असताना घ्यावयाची काळजी देखील तितकीच महत्वाची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कांही प्रात्यक्षिके देखील सादर केली .
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना योगाचार्य रामचंद्र गरड यांनी प्राणायामाचे महत्व सांगत कांही प्रात्यक्षिके सादर केली, व प्राणायामाचे रहस्य देखील विषाद केलेले. ते म्हणाले की, पटवारी यांनी केलेले भाष्य व वाचक संवाद हा उपक्रम देखील चिंतनशील वृत्ती निर्माण करून नवी दृष्टी देणारा तेवढ्याच महत्त्वाचा आहे.
येथील हनुमान मंदिरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे संचलन संयोजक अनंत कदम यांनी केले, तर आभार तुलसीदास बिरादार यांनी मानले. या कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुमित्रा वट्टमवार, उषा तोंडचिरकर, योगतज्ञ भातंबरे, विनोदाचार्य पटने गुरुजी, अंधश्रद्धा निर्मूलन पदाधिकारी प्रा. गोपाळ पाटील , पुस्तक मित्र दीपक बलसुरकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा.राजपाल पाटील, आनंद बिरादार, राजेंद्र एकंबेकर, हनुमंत म्हेत्रे, सुरेश वजनम, मिटू पाटील, मुरलीधर जाधव आदींनी परिश्रम घेतले.
