शिवाजी महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी

शिवाजी महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायकराव जाधव यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला .यावेळी उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही आर भोसले, पर्यवेक्षक जी जी सूर्यवंशी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य जाधव यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती समिती प्रमुख डॉ एस व्ही शिंदे यांनी तर आभार डॉ. सी जे देशमुख यांनी मानले . या जयंतीला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!