एम आय एम मध्ये पुन्हा प्रवेश केल्याबद्दल ताहेर हुसेन यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल. पी. उगीले) : एम आय एम चे माजी जिल्हाध्यक्ष तथा एमआयएमचे नेते माजी नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन हे गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र त्या ठिकाणी आपली फसगत झाली, आपल्याला खोटी आश्वासने दिली गेली, आणि ते पाळली गेली नाहीत. त्यामुळे आपण पुन्हा स्वगृही अर्थात एम आय एम पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करून ताहेर हुसेन यांनी मराठवाडा विभागाचे एम आय एम चे प्रमुख फिरोज खान लाला सहाब यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
याबद्दल एम आय एमचे उदगीर तालुका अध्यक्ष मुकक्रम जहागीरदार यांच्या संपर्क कार्यालयात सय्यद ताहेर हुसेन यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सय्यद ताहेर हुसेन यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस मधून एम आय एम मध्ये आलेले फिरोज पठाण व सद्दाम मौलाना यांचाही सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारोहाच्या अध्यक्षस्थानी फकीर हाशमी भाई हे उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी नियोजन व विकास सभापती नगरपरिषद उदगीरचे निवृत्तीराव सांगवे हे होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगवे यांनी स्पष्ट केले की, गेल्या वेळेस झालेल्या चुका सांभाळून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात एमआयएम पक्ष सर्व शक्तीनिशी सामोरे जाणार असल्यामुळे निश्चितपणे नगरपरिषदेवर एम आय एम चा झेंडा फडकवला जाईल, अशी खात्री दिली. तसेच एमआयएम च्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कर्तबगार आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना निश्चितपणे संधी दिली जाईल. असाही विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रसिद्धी प्रमुख बंटी विठ्ठलराव घोरपडे यांनी केले. याप्रसंगी सोहेल पठाणजी, राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी जवळे, राजू मनियार, चिखलीकर बंधू यांच्यासह प्रभाग 11 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एमआयएम मध्ये इतरही प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ताहेर हुसेन यांनी जाहीर केले की, “सुबह का भुला शाम को घर लौटा, तो उसे भुला नही कहतेl”
तशा पद्धतीने मी आता पुन्हा दुप्पट ताकतीने एमआयएम पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणार आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संयोजक तथा एमआयएमचे उदगीर तालुकाध्यक्ष मुक्रम जाहगीरदार यांनी मांडले.
