मानव जातीच्या कल्याणासाठी कंबळीबाबा यांचे कार्य – प्रा. दत्तहरी होनराव

मानव जातीच्या कल्याणासाठी कंबळीबाबा यांचे कार्य - प्रा. दत्तहरी होनराव

उदगीर (एल.पी.उगीले) : स्व. प्रभुराव कंबळीबाबा यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. निजाम राजवटीत त्यांनी हैद्राबाद येथे बी. बी. हॉस्टेलची सुरुवात केली. ही मोठी क्रांती होय असे प्रतिपादन उदगीर येथील श्री हावगीस्वामी विद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. दत्तहरी होनराव यांनी केले.
उदगीर येथे वीरशैव समाजाच्या वतीने कंबळीबाबा यांच्या २९ व्या पुण्यस्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षिका शिवकांता नागुरे या होत्या. यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्रा. होनराव यांनी, निजाम राजवटीत लिंगायत समाजाला संघटित करून महात्मा बसवन्ना यांचे विचार कृतीतून प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून समाजात रुजविण्याचे मोठे कार्य प्रभुराव कंबळीबाबा यांनी केले. हैद्राबाद मुक्ती संग्रामात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे असे सांगून अनुयायांच्या वर्तनावर महात्म्यांचे श्रेष्ठत्व ठरत असते. गळ्यात लिंग बांधणे हा विज्ञानवाद असल्याचे नमूद केले. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित झाले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव समाजाचे सचिव अँड. श्रीकांत बडीहवेली यांनी केले. सूत्रसंचालन राजकुमार बिराजदार बामणीकर यांनी केले. आभारप्रदर्शन रविंद्र हसरगुंडे यांनी केले. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!