शिवाजी महाविद्यालयाचा हॉलीबॉल महिलांचा संघ विजयी
उदगीर (एल.पी.उगीले) : महिलांच्या हॉलीबॉलचे सामने घोनसी येथे नुकतेच पार पडले. अंतर महाविद्यालयीन” ब” विभागीय महिला हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय उदगीरचा महिलांचा संघ विजयी ठरला.संघाची कर्णधार कु शिंदे सलोनी , कु जगताप अश्विनी , कु,सोनवने अश्लेषा, भ्रमण शिवानी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघास किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. जाधव, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही.जगताप, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.विलास भोसले,पर्यवेक्षक प्रा.जी.जी.सूर्यवंशी शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा विभागाचे संचालक प्रा. नेहाल खान प्रा. गजानन माने यांनी खेलाडुंना मार्गदर्शन केले.
