महात्मा फुले महाविद्यालयात आद्यकवी वाल्मिकी यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, अजय मुरमुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामायण या महाकाव्याची निर्माते आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
