अहमदपूर येथे अमित ठाकरे यांच्या हस्ते मनसे कार्यालयाचे उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या अहमदपूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे,सरचिटणीस संतोष नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते व विद्यार्थी यांची मोठी गर्दी झाली होती. डॉ भिकाणे यांचे कार्य नेहमीच समाजहिताचे असते असे अमित ठाकरे यांनी सांगितले. यावेळी दोनशे तरुण कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला.जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील भिकाणे टॉवर येथे सुरू केल्याने जनतेला फायदा होईल असे मत डॉ भिकाणे यांनी व्यक्त केले.यावेळी जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप शेळके, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण,तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,सुरज पटेल,सोमनाथ कलशेट्टी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शहराध्यक्ष उमेश रेड्डी,मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष यश भिकाणे,मनवीसे तालुकाध्यक्ष अतिष गायकवाड,तालुकाउपाध्यक्ष ज्ञानोबा जाधव,नितीन पलमटे, सचिव विलास पाटील,तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील,विकास सूर्यवंशी,सुभाष कांबळे, कृष्णा सुरवसे,मनकासे जिल्हाउपाध्यक्ष गहनिनाथ सोमवंशी, गजानन पांगरे,वाल्मिक पिलेवाड, गणेश शिंदे,मतीन शेख,दस्तगिर शेख, माणिक धुमाळ,संतोष नारागुडे, तुकाराम कासले, राघव जोंधळे, लखन कांबळे, तेजस गायकवाड, राजेंद्र लोंढे,रोहित कांबळे, नवाज पठाण यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाने शहर मनसेमय झाले होते.
