मुलीच्या वाढदिवसानिमित्त जि.प शाळेला पाच पंखे भेट

मुलीच्या वाढदिवसानिमित्त जि.प शाळेला पाच पंखे भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी बुद्रुक ता अहमदपूर येथे कु. वैष्णवी योगेश कदम या मुलीचा पहिला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला कु. वैष्णवीचे वडील योगेश सूर्यकांत कदम यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाच बजाज कंपनीचे सिलिंग फॅन भेट दिले. या वाढदिवसाचे विशेष महत्व म्हणजे कु. वैष्णवी मुंबईत डोंबिवली येथे राहते व तिचा वाढदिवस सिंदगी बुद्रुकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक केशव काचे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव मुळे, श्रीराम कदम पोलीस कॉन्स्टेबल नांदेड, रामेश्वर महाराज कदम, विश्वनाथ मुळे, राम श्रीमंगले साप्ताहिक ग्रामीण उद्देश व शाळेतील शिक्षक कल्याणी सर, मारुती कदम सर, बोडके सर, बालाजी मुंडे, विलास तरडे, कमलाकर पवार, आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजकुमार गोंटे यांनी केले तर आभार संतोष कदम सिंदगीकर यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!