कर्तुत्वान महिलांच आधुनिक काळातली नवदुर्गा – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

कर्तुत्वान महिलांच आधुनिक काळातली नवदुर्गा - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

जळकोट ( गोविंद काळे) :समाजाला राष्ट्राला अनेक नवदुर्गांनी योगदान देऊन आपल्या कुटुंबाला व समाजाला प्रेरणा दिली आहे.विज्ञान, समाजकारण,राजकारण, क्रीडा,शिक्षण,उद्योग, अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील भारतातील महिलांनी इतिहासाच्या पानावर आपल्या कार्याचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे आणि त्याच भारताच्या कर्तुत्ववान नवदुर्गा आहेत त्यांचा आदर्श महिलांनी घ्यावा असे आवाहन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. जळकोट भवानीनगर येथील नवदुर्गा मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी थोटे,उपाध्यक्ष संजीव मिसाळे, कार्यकारी अध्यक्ष दत्ताजी बोधले,महेश सोनटक्के सुलोचना बहेणजी सुशीला डांगे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की कुटुंब धर्म रूढी आणि परंपराच्या नियंत्रणामुळे समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते समाजाच्या प्रत्येक स्तरावर पितृसत्ताक मूल्ये आणि पद्धतीचा पगडा होता यामुळे समाजात दुजाभाव निर्माण झाला होता.परंतू वैदिक काळामध्ये स्त्रियांना पुरुषा बरोबरीचा दर्जा होता. कालांतराने स्त्रियांना चूल आणि मूल एवढ्या परिघांमध्येच डांबून ठेवले ऐतिहासिक काळामध्ये आदर्श राजमाता जिजाऊ, पराक्रमी विरांगणा महाराणी येसूबाई, रणधुरंदर व कुटनितिज्ञ महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई, पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले या महिलांनी स्वतःच्या कर्तुत्वाची पताका अटकेपार लावली आहे. कलाक्षेत्रामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर प्रसिद्ध गायिका अशा भोसले, किशोरी अमोनकर, साहित्यिक महादेवी वर्मा या महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मानाचे स्थान निर्माण केले आहे. भारताच्या धावपटू पी.टी.उषा,सानिया मिर्झा यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये नाव केले. राजकीय क्षेत्रामध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीराकुमारी या महिलांनी राजकीय क्षेत्रामध्ये या नवदुर्गांनी आपले कर्तव्य सिद्ध करून दाखवले.खरे तर याच भारताच्या नवदुर्गाच त्यांचा आदर्श इतिहास आपल्या घरात मुला-मुलींना वाचायला द्यावा.तरच येणारी पिढी सुसंस्कारी जन्माला येऊ शकेल.जी माणसे घरात इतिहास वाचतात तीच माणसे इतिहास घडवतात.नाहीतर दाने नसलेली कणस आणि विचार नसलेली माणसं सारखीच असतात असे सांगताना बुद्रुक पाटील म्हणाले की घरातील घर कामापासून ते संरक्षण मंत्री पदापर्यंत रिक्षा चालक ते पायलट पदा पर्यंत शिक्षकेपासून ते राष्ट्रपती पदापर्यंत चहाच्या टपरी पासून ते हजारो कंपन्या चालवणाऱ्या उद्योगी महिला पर्यंत या महिलांच्या आयुष्यातील संघर्ष,जिद्द,चिकाटी, प्रचंड मेहनत,त्याग, धाडस आणि न डगमगता आव्हानांना तोंड देण्याची तयारी हे स्त्रियांना जमवू शकते ही त्यांनी करून दाखवले. या महिलांचे जीवनचरित्र वाचल्यावर समजू शकते.त्यांच्या उत्तम चरित्राची,उत्कृष्ट कार्याची माहिती आपल्या घरातील मुला मुलींना सांगणे गरजेचे आहे.याच आमच्या भारताच्या नवदुर्गा आहेत असे प्रा.मारोती बुद्रुक पाटील म्हणाले. यावेळी शादुल पठाण यांनीही मनोगत व्यक्त करताना आजची मुले स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावीत यासाठी आई-वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे त्यांच्यावर योग्य संस्कार करूनच त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करावे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीबाळू बोधले अनिल शेवाळे धून राम पेटकर बापूराव ब्रह्मणा संजय डांगे राजकुमार धूळ शेटे पांडुरंग हत्तरगे शंकर अंकुलगे धनंजय एलमेवाड व्यंकटी बोधले विश्वनाथ बोधले आदींनी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!