जिल्हास्तरीय बॉल बॕडमिंटन स्पर्धा व निवड चाचणी
अहमदपूर (गोविंद काळे) : गोंदिया येथे दिनांक १३ ते १६ आक्टोबर २०२२ दरम्यान होणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्रा स्टेट सब ज्युनिअर बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशीप (मुले व मुली) यासाठी लातूर जिल्हा संघ निवड चाचणी व स्पर्धा यांचे रविवार दिनांक ०९ आक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता किलबील नॕशनल स्कुल अहमदपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील ०२/०१/२००७ रोजी नंतरचा जन्म असलेल्या सर्व मुले व मुली खेळाडूंनी आपल्या जन्मदाखल्या सह स्पर्धा व निवड चाचणी साठी हजर रहावेत असे आवाहन अध्यक्ष श्री ज्ञानोबा भोसले,श्री संगमेश्वर निला,सचिव असद शेख, मुख्याध्यापक श्री संतोष पाटील,अकबर पठाण,अदनान शेख व अय्युब जहागीरदार यांनी केले आहे.
