माउंट लिटरा झी स्कूलच्या विद्यार्थ्याचे कराटे स्पर्धेत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील माउंट लिटरा झी स्कुल च्या कराटे खेळाडूंनी ५ वी जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत कु. स्पृहा राठोड – सुवर्णपदक, व केदार नागराळे – कास्यपदक , पटकावले आहे. सदरील स्पर्धा वर्ल्ड जापनीज शोतोकॉन कराटे ऑर्गनायझेशन तर्फे लातूर येथील श्रीमती. सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय स्टेडियम येथे ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या यशाबद्दल माउंट लिटरा झी स्कुल चे प्राचार्य – रोशन डि कोना, शैक्षणिक समन्वयक- सौ.कल्पना चौधरी, आणि सर्व शिक्षक वर्गाने खेळाडूंचे कौतुक केले आहे. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक – संदिप स. पवार, विरसागर काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
