संगीता सोनाळे यांच्या ” इयत्ता तिसरी गणित स्वाध्याय पुस्तीका” चे प्रकाशन संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड,शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर व शिक्षण विभाग पंचायत समिती उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेत येथील उपक्रमशील शिक्षिका तथा कवयित्री संगीता सोनाळे यांच्या ” इयत्ता तिसरी गणित स्वाध्याय पुस्तीका” चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडचे प्राचार्य राजेंद्र गिरी, डायटच्या व्याख्याता डॉ. भागीरथी गिरी, उपशिक्षणाधिकारी भगवान फुलारी, लातूरचे गटशिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले, शिरूर अनंतपाळ चे गटशिक्षणाधिकारी पागे , निलंगाचे गटशिक्षणाधिकारी गायकवाड , उदगीरचे गटशिक्षणाधिकारी लोहकरे , शिक्षण विस्तार अधिकारी येडले, डायटचे भापकर व शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष किशनराव बिरादार व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी” विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही पुस्तीका अतिशय चांगली, उत्तम दर्जाची आहे.विद्यार्थी ही पुस्तीका सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही.”असे विचार व्यक्त केले. संगीता सोनाळे हया उपक्रमशील शिक्षिका असून त्या कवयित्री आहेत.त्यांचा यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “अंतरंग”नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.
