वाढवणा पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांशी आर्थिक संगणमत करून सामान्य गरीब ग्राहकांची आर्थिक लुट
वाढवणा बु (हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी व हाळी येथील किरकोळ देशी दारू दुकानाला नियमाची, कायद्याची, व राज्यउत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची व पोलीस प्रशासनाची कसलीच भिती दिसत नाही. सर्व नियम, कायदा डावलून पहाटे पासुन दारू विक्री व अवैध विक्रीसाठी परिसरातील गावात मोटारसायकलवर या दुकानातून दारू पेठ्यांच्या पेठ्या पार्सल केले जातात,तरी देखील राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन असताना देखील हे दुकानदार सर्व नियम, कायदा पायदळी तुडवत संबंधित खात्याच्या अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संगणमत करून खुलेआम वेळेच्या अगोदर दुकान उघडुन कायद्याचे उलंघन करीत नियम डावलून दिवसा ढवळ्या किमती पेक्षा ज्यादा दराने दारू विक्रीकरून ग्राहकांची आर्थिक लुट केली जात आहे,असा आरोप होत आहे. मात्र या दुकानदाराला राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे तसेच कायदा अबाधित ठेवणारे पोलीस अधिकारी, दूरक्षेत्राचे बिट जमादार, कर्मचारी साथ देत असल्यामुळेच हाळी व वाढवणा पाटीवरील दारू दुकान वेळेच्या अगोदर पहाटे चालु करून अवैध पेठ्याची वाहतूक व किरकोळ बाटली ज्यादा दराने विक्री केली जात आहे,असेही तळीराम सांगतात. अवैध विक्रीसाठी पेठ्या पार्सल करणाऱ्यांची ज्यादा दराने विक्री होत असल्याची वेळे अगोदर दुकान चालु करत असल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी उदगीर यांना पुर्ण माहिती असुन देखील या दुकानावर कसलीच कार्यवाही होत नाही.याचे आश्चर्य वाटत आहे अशी चर्चा हाळी व वाढवणा पाटी वरील सुजाण नागरिक करताना दिसत आहेत. आता तरी वरीष्ठानी जातीने लक्ष घालुन आजू बाजूच्या व हाळी, वाढवणा पाटीवरील सामान्य नागरिकांशी संवाद साधुन सर्व खरी माहिती जाणून घेउन दुकानावर व दुकानदारावर कडक कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
