इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस म्हणजे गुणवंत व यशवंत विद्यार्थी घडविण्याचा कारखाना – सभापती मुन्ना पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास घडवून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणारे इच्छापूर्ती कोचिंग क्लास म्हणजे गुणवंत व यशवंत विद्यार्थी घडविण्याचा कारखाना आहे. असे गौरवोद्गार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी काढले.
पुढे बोलताना त्यांनी माझी स्वतःची तीन लेकरं याच क्लासेस मध्ये शिकून, सध्या माझा मुलगा जर्मनी येथे उच्च पदावर आहे. तर एक मुलगी इंजिनिअरिंग नंतर एमबीए करून जॉब करत आहे. तर दुसरी मुलगी डॉक्टर बनली आहे. आणि याचे सर्व श्रेय मी प्रा. सिध्देश्वर पटणे यांच्या मेहनतीस व इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसाला देतो. कारण इतरांकडून ऐकून नाही तर मी स्वतः या क्लासेसच्या गुणवत्तेचा साक्षीदार असलेल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्लासेस मधील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे मार्गदर्शक गुंडप्पा पटणे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गायकवाड,स्पंदन हॉस्पिटलचे डॉ.नवनाथ सोनाळे, सुप्रसिद्ध उद्योजक प्रा.सोमनाथ बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल बबन चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल फुलारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले, व आजपर्यंतची क्लासेसची वाटचाल सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना आणखीन जास्त अभ्यास करण्याची प्रेरणा मिळवून देण्यासाठी अशा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करत असल्याचे सांगितले. यावेळी क्लासेस मधील विद्यार्थ्यांसाठी अतिशय जिद्दीने, चिकाटी, मेहनतीने व तळमळीने धडपडणाऱ्या प्रा.संजय जामकर, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.ज्ञानेश्वर केंद्रे, प्रा.अशरफ खान प्रा.सौ.नळगीरे , प्रा.कु.सुप्रिया स्वामी, प्रा.कु.प्रियंका राठोड, व्यवस्थापक श्री.चंद्रकांत काटवटे इत्यादी क्लासेसमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचलन व आभारप्रदर्शन प्रा.संजय जामकर यांनी केले.
