शिक्षक मतदार संघाच्या याद्या बनवणे सुरू

शिक्षक मतदार संघाच्या याद्या बनवणे सुरू

उदगीर (एल.पी.उगीले) : दि.०१ नोव्हेबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या‍ मतदार यादया नव्याने तयार करण्या बाबतच्या् पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने दि.१२/१०/२०२२ रोजी तहसील कार्यालय उदगीर येथे तालूक्यातील सर्व माध्यमाच्या माध्यमी‍क शाळेचे मुख्याध्यापक व त्यावरील शिक्षण संस्थेचे प्राचार्य यांची प्रविण मेंगशेट्टी,पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी उदगीर यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेण्यात आली.
सदरील बैठकीत अर्ज भरण्यासाठी लागणारी पात्रते बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सदरील मतदार नोंदणी कार्यक्रम १ ऑक्टोेबर २०२२ ते ७ नोव्हेंबर २०२२ पर्यत मतदार नोंदणी करण्यात येणार असून सदर मतदार नोंदणी फॉर्म १९ स्वी‍कृती साठी तहसील कार्यालय उदगीर येथे मंडळ निहाय नियोजन करण्या्त आले आहे. व सविस्तर मार्गदर्शन करून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येवून मतदार नोंदणी करावी ,असे प्रविण मेंगशेट्टी,पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी उदगीर , रामेश्वर गोरे तहसीलदार उदगीर , संतोष गुटे नायब तहसीलदार (निवडणुक) , पठाण इम्रान खान व बालाजी मुतंगे यांच्या वतीने जास्तीत जास्त मतदाराची नोंदणी करावे असे आव्हान करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!