नागतीर्थवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत फवारणी औषधांचे वाटप

नागतीर्थवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत फवारणी औषधांचे वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : कृषी विभागा मार्फत सोयाबीन मूल्य साखळी मधील शेवटची शेतीशाळा व असलेल्या उद्दिष्टाचे वाटप म्हणून शेतकऱ्यांना फवारणीसाठी लागणारी औषधे (निंबोळी अर्क, रासायनिक कीटक नाशक, किटकासाठी ट्रॅप,सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2) याचे वाटप करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच राज गुणाले, कृषी सहाय्यक जी.पी .सूर्यवंशी व गावातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागतिर्थवाडी येथे कृषी विभागाच्या योजना प्रत्येक्ष शेतकऱ्याना मिळत असलेला लाभ हा कृषी सहाय्यक सुर्यवंशी यांच्या परिश्रमा मुळे मिळत आहे, असे समाधान उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
कृषी विभागाच्या प्रत्येक योजना गावात येणे शेतकऱ्यांना त्याबद्दल सविस्तर माहिती देणे , त्यांना प्रवृत्त करणे व त्यांच्याकडून योग्य ती माहिती संकलित करणे. व गावाला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या हेतूने प्रयत्न करणे, हे काम कृषी सहाय्यक सुर्यवंशी जी.पी. करत असतात, म्हणून त्यांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने गावचे सरपंच राज गुणाले यांनी यावेळी आभार व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!