उसाच्या फडात गांजाची शेती !! नशेच्या बाजाराला ग्रामीण पोलिसांकडून मूठमाती !!!

उसाच्या फडात गांजाची शेती !! नशेच्या बाजाराला ग्रामीण पोलिसांकडून मूठमाती !!!

रोख ठोक :: एल.पी.उगीले : शासनाने प्रतिबंधित केलेल्या आणि ग्रामीण भागात नशा करण्यासाठी सर्रास वापरात येणाऱ्या गांजाची शेती करण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरज या गावी एका शेतकऱ्याने करण्याचा प्रयत्न केला, गांजाच्या शेतीतून नशेचा बाजार मांडायचा आणि भरमसाठ पैसा कमवायचा. हे त्या शेतकऱ्याचे स्वप्न उदगीर ग्रामीणच्या कर्तबगार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळीस मिळवले आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरज ता. चाकूर या गावातील शेतकरी दशरथ रामचंद्र कांबळे यांनी आपल्या शेतातील उसाच्या फडात गांजाची झाडे लावून त्याची वाढ करण्याचा, तसेच काही वाढलेली झाडे तोडून वाळवलेले उदगीर ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाला निदर्शनास आली आहेत. तब्बल दहा लाखाहून अधिक रुपये किमतीच्या या नशेच्या बाजाराचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी तपास लावून आरोपीला अटक केली आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, डोंगरज गावच्या शिवारात दशरथ रामचंद्र कांबळे यांची शेती आहे. त्या शेतीमध्ये ऊस आहे, त्या उसाच्या फडात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, माहिती हाती येताच त्यांनी या संदर्भात वरिष्ठांना कल्पना देऊन आपल्या निवडक साथीदारांना सोबत घेऊन उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे चाकूर तालुक्यातील डोंगरज गावच्या शेत शिवारातील दशरथ रामचंद्र कांबळे यांच्या शेतामध्ये जाऊन शोध घेतला असता, त्या ठिकाणी गांजाची 44 झाडे ज्याचे वजन 109 किलोग्रॅम पेक्षा जास्त तसेच त्याच शेतामध्ये गांजाची वाळवून ठेवलेली झाडे व गांजाची पाने ज्याचे वजन एक किलो 700 ग्रॅम ज्याचे प्रति किलो किंमत नऊ हजार असे एकूण दहा लाख १६१९ रुपये किमतीचा मुद्देमाल उदगीर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.
तसेच या शेतीचे मालक दशरथ रामचंद्र कांबळे यांनी उसाच्या शेतात बांधावर विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजासारख्या प्रतिबंधित वनस्पतीची,गांजा झाडांची आर्थिक फायद्याच्या हेतूने लागवड केली असल्याचे आढळून आले. याबाबत ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजी. नंबर 646/ 22 कलम 8, 20, 22 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दशरथ रामचंद्र कांबळे (वय 47 वर्ष राहणार डोंगर तालुका चाकूर) यास या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
सदरील कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कांबळे, राम बनसोडे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, नामदेव चेवले, सखाराम भिसे, सिद्धेश्वर स्वामी, कृष्णा पवार, शिवदास बोईनवाड, गंगाधर साखरे, नजीर शेख इत्यादींच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे हे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन आणि ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

About The Author

error: Content is protected !!