किलबिल नॅशनल स्कुल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

किलबिल नॅशनल स्कुल मध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून इयत्ता 7 वी वर्गाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक श्री ज्ञानोबा भोसले तर व्यासपीठावर शाळेचे प्राचार्य संतोष पाटील पर्यवेक्षक महावीर गोडभरले, विज्ञान शिक्षक परवेज शेख, गोविंद चामे, श्रीधर आडिके, रेखा बालूरे, सारिका भाटे, आफ्रिन शेख आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनापासूनच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या प्रयोगांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी व त्यांना उत्तेजना मिळावी म्हणून एकूण प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा स्वरूपात सदरील प्रयोगांना बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये अक्षय कोंडापुरे व प्रणव जंगवाड यांनी सादर केलेल्या कोरोना सॅनिटायझर मशीन या प्रयोगास प्रथम तर प्रज्वल चिल्लरगे याच्या चॉकलेट ATM यास द्वितीय तर अदिती बजाज हिच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग यास तिसरा क्रमांक मिळाला. उर्वरित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 7वी वर्गातील कु कनक जाजू, ऋतुजा मुरळे व पार्थ शिरुरे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author