सर्व रोग निदान व गोळ्या वाटपाचे शिबिराचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी) : शिवनगर, मलकापूर ता.उदगीर जि.लातूर येथे सर्व रोग निदान व मोफत गोळ्याचे वाटप याचे शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर ग्रामपंचायत सदस्य शिवलिंग अण्णा मुळे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती डॉ.अंतेश्वर हवाना सर, डॉ.रूपाली लोहकरे मॅडम, मधुर डायबिटीज स्पेशलिटीचे डॉ. प्रशांत नवटके सर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये एम पी डब्ल्यू जाधव सर,एस एस तवर सिस्टर, सर्व आशा वर्कर आणि अंगणवाडी वर्कर उपस्थित होते. यावेळी एकूण 52 लोकांची मधुमेह व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 16 मधुमेही तर 23 रक्तदाबाची रुग्ण आढळून आली. मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी नवीन, स्वप्निल फुलारी यांनी केली.
