कोराळी येथे सैन्य दलातील सेवानिवृत्त धनंजय पाटील यांचा सत्कार

कोराळी येथे सैन्य दलातील सेवानिवृत्त धनंजय पाटील यांचा सत्कार

निलंगा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोराळी येथे देशसेवेसाठी कार्यरत असणारे जवान सुभेदार धनंजय सुभाष पाटील यांच्या देशसेवा निवृत्त समारंभ सोहळ्सास धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे दादा निंबाळकर व संतोष भाऊ सोमवंशी उपसभापती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी यासंदर्भात देश सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या अशा बहाद्दुर योध्याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो, कारण या देशाचे शूरवीर जवान अहोरात्र आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात. आणि या देशांच्या जडणघडणीमध्ये अशा अनेक जवानांचा फार मोलाचा वाटा आहे. असे मत सोमवंशी यांनी मांडले. आणि सुभेदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.व तसेच कोराळी गावातील गुणवंत व किर्तीवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी माननीय खासदार ओमदादा राजे निंबाळकर व संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने, माजी कृषी सभापती श्री.बजरंग दादा जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे, औसा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्री.किशोर जाधव, शिवसेना उप-तालुका प्रमुख किशोर भोसले, अनिल आरीकर, महेशदादा सगर व यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!