शांता शेळके यांना जन्मशताब्दीदिनी शांताबाईंना स्वरांजली

शांता शेळके यांना जन्मशताब्दीदिनी शांताबाईंना स्वरांजली

उदगीर (एल.पी.उगीले) : बालगीतांपासून नववधूच्या गाण्यापर्यंत आणि भक्तीगीतापासून लावणीपर्यंत अशा विविधांगी गितांच्या सादरीकरणातून अक्षरसम्राज्ञी शांताबाई शेळके यांना उदगीरमध्ये स्वरांजली अर्पण करण्यात आली.शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित मैफिलीस उदगीरकरांनी भरभरुन दाद दिली.
विविधांगीसाहित्यलेखनातून मराठी साहित्यविश्वावर आपली अविट नाममुद्रा उमटविणा-या शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या समारोपानिमित्त ‘असेन मी-नसेन मी’ या स्वरांजलीचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या संकल्पलनेतून आयोजित या स्वरांजली सोहळ्यात शांताबाई शेळके यांच्या शब्दांना गोपाळराव जोशी,शाम कुलकर्णी ,सौ.सविता बारस्कर,शिवलिला वाडकर,प्राचार्य डॉ.एस.बी.संदीकर यांनी स्वरसाज चढविला.

यावेळी शांताबाई शेळके यांची बालगीते,भक्तीगीते,कोळीगीते,लावणी,भावगीते अशा विविधांगी रचना कलावंतांनी सादर केल्या.सहयोग बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर ,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ .रमाकांत मध्वरे,विश्वनाथ मुडपे, अविनाश हेरकर,अमोल निडवदे,अव्होपा चे अध्यक्ष प्रा,संजय चन्नावार,सतीश पाटील मानकीकर यांनी शांताबाई शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन केले.प्रा.डॉ .गौरव जेवळीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. धनंजय गुडसूरकर यांनी शांताबाई शेळके यांच्या विविधांगी पैलूंची मांडणी करीत केलेले निवेदन या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.प्रा.सौ.आश्विनी देशमुख यांनी सुत्रसंचालन तर विक्रम हलकीकर यांनी आभार मानले.प्राचार्य डॉ .बी.एम.संदीकर,अविनाश हेरकर,राजाराम चव्हाण ,सौ.अनिता जगताप,सौ.निता मोरे, यांनी यासाठी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!