धर्मपाल देवशेट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटी कपडा बँक येथे फळवाटप

धर्मपाल देवशेट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटी कपडा बँक येथे फळवाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक तथा भाजपा नेते धर्मपाल देवशेट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मपाल देवशेट्टे मित्रमंडळाच्या वतीने रोटी-कपडा बँक उदगीर येथे फळवाटप करण्यात आले. यावेळी मित्रमंडळाचे राहुल शाह, पिंटू सुतार, अशोक सोनवणे चंद्रकांत जाधव, घाडगे सावकार ओम हवा, राहुल बिरादार, बालाजी भोसले, संतोष गर्जे, महारुद्र पाटील, उद्योजक योगेश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक जाणीव जपणाऱ्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातूनच साजरा करावा, या भावनेने मित्र मंडळाच्या वतीने उदगीर येथील बेघर निवारा केंद्रातील नागरिकांना मदतीचा हातही देण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!