किलबिल नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : 24 वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अहमदनगर येथे पार पडली. यामध्ये किलबिल नॅशनल स्कूल चे विद्यार्थि जान्हवी जाधव- सुवर्ण पदक, रोहिणी पाटील- कास्य , ओवेस शेख- रौप्य ई.पदक मिळविले. तसेच कु. जान्हवी जाधव व रोहिणी पाटील यांची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ताभाऊ गलाले, वाजिरोद्दीन काझी, मोसीन शेख, आकाश बनसोडे, संघ व्यवस्थापक कु. माही आरदवाड यांचे प्रशिक्षण लाभले. यावेळी शाळेचे संचालक ज्ञानोबा भोसले , प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले, ऑफिस इन्चार्ज सचिन जगताप क्रीडा शिक्षक विशाल सरवदे, इरफान अकोले, बी. एल. अभिजीत, शुभम गुंजरगे, मधुकर दासरे यांनी सत्कार करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
