जनाबाई जाधव पाटील काळेगावकर यांचे दुःखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : तालुक्यातील काळेगाव येथील धार्मिक प्रवृत्तीच्या जनाबाई श्रीरंगराव जाधव पाटील यांचे दि .11 ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 95 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर बुधवारी काळेगाव येथील त्यांच्या शेतामध्ये सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात तीन मुले, तीन मुली, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवारा असून उद्योजक परमेश्वर पाटील यांच्या त्या मातोश्री आणि माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या त्या चुलती होत. त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
