उजना येथे श्री.संत सदगुरुनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळ्य‍ाचे आयोजन

उजना येथे श्री.संत सदगुरुनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळ्य‍ाचे आयोजन

उजना (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे अहमदपुर तालुक्यातील उजना येथे ग्रामदैवत श्री संत सदगुरुनाथ महाराज य‍ांच्या ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम‍ाच्या रुपरेषेत मिती आ.कृ. ११ शके १९४४ शुक्रवार दि. २१ आक्टो. २०२२ सकाळी ७ ते ९ महाराजांच्या समाधीस रुद्राभिषेक त्य‍ानंतर महाप्रसाद व रात्री ९ ते ११ ह.भ.प. शंकर महाराज स्वामी घटंग्रेकर यांचे किर्तन होईल. मिती आ.कृ. १२ शके १९४४ शनिवार दि.२२ आक्टो. २०२२ रोजी सकाळी ७ वा उजना नगरीत पालखीचे प्रस्थान होईल व पालखी मठात आल्यानंतर सामुहीक आरती व महाप्रसाद होईल. या पालखी सोळ्यासाठी पंचक्रोशितील भावीक‍ंनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा अवाहन श्री.संत सदगुरुनाथ महाराज संस्थान चे मठाधिपती श्री.ईरन्नाथ महाराज यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!