डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ, ‘ मिसाईल मॅन’ तथा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन आणि कार्यावर शनिवार दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता येथील महात्मा फुले महाविद्यालयात एकदिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

झूम मीटिंगवर होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय, आंतरविद्याशाखीय चर्चासत्राचे उद्घाटन ग्लोबल संस्कृत फोरम दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सेन गुप्ता हे करणार असून यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर आणि सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे भूषविणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा सामाजिक विचारवंत डॉ. नारायण भोसले यांचे बीज भाषण यावेळी होणार असून, त्यानंतर होणाऱ्या शोधनिबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रामभाऊ मुटकुळे हे भूषविणार आहेत. याप्रसंगी डॉ. अकबर लाला (अहमदपूर), प्रोफेसर सुरेश दांडगे (सांगली), आणि डॉ. नाथराव घरजाळे (अंबाजोगाई ) हे अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. झूम मीटिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या चर्चासत्रास ऑनलाइन पद्धतीने सर्व विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक आणि प्राध्यापक मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इतिहास विभाग प्रमुख तथा संयोजक डॉ. बब्रुवान मोरे, व ग्लोबल संस्कृत फोरमचे सचिव डॉ. राजेश मिश्रा यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!