अहमदपूरच्या महावितरणकडून महात्मा फुले महाविद्यालयाचा भेटवस्तू देऊन सन्मान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा प्रादेशिक महावितरण कार्यालय औरंगाबाद शाखा अहमदपूरच्या वतीने नियमित वीज बिल भरणा केल्यामुळे किचनसेट देऊन सन्मानित केले. प्रादेशिक महावितरण कार्यालय औरंगाबादच्या वतीने नियमित वीज बिल भरणा-या ग्राहकांसाठी प्रोत्साहन पर लक्की ड्रॉ बक्षीस योजने अंतर्गत महात्मा फुले महाविद्यालय यांचे नाव मध्ये आले.
महात्मा फुले महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सेवेसह विद्यापीठ असो की,शिक्षण सहसंचालक कार्यालय असो की अन् कोणत्याही कार्यालयाच्या कामकाजात आपली वेळेत सेवा देण्यात नेहमीच अग्रेसर असते. त्याचाच एक भाग महावितरण कार्यालय कडून येणाऱ्या बिलभरणा बाबत हे महाविद्यालय जागरूक असते.त्याचीच दखल लक्की ड्रॉ पद्धतीने घेण्यात आली आहे. यात लागलेले ‘किचन सेट’ हे बक्षीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना अहमदपूर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सतीश गुडे, सहाय्यक अभियंता महमद जिलानी, कनिष्ठ लिपीक सुदर्शन सूर्यवंशी, बालाजी कांबळे, मुख्य तंत्रज्ञ दत्तात्रय इब्बितवार आदि मान्यवरांनी सन्मानाने प्रदान केले.
यावेळी महाविद्यालयाचे, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, मुख्य लिपिक प्रशांत डोंगळीकर यांच्यासह अजय मुरमुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपीसह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रादेशिक महावितरण कार्यालय औरंगाबादच्या या उपक्रमाचेव महावितरण अहमदपूर शाखेचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आभार व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले.
