विनाअनुदानित शिक्षकांच्या महाएल्गार आंदोलनाला आमदार बाबासाहेब पाटील यांचा पाठिंबा
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या महाएल्गार आंदोलनाला अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला. शिक्षक समन्वय संघ, कायम विनाअनुदान शाळा कृती समिती, अघोषित शिक्षक महासंघ यासारख्या विविध संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाची परिस्थिती असूनही आर्थिक अडचण असताना आघाडी सरकारने ज्या शाळा कॉलेजला काहीच अनुदान नव्हतं अशा शाळा कॉलेजला 20 टक्के अनुदान दिले व ज्यांना 20 टक्के अनुदान होते अशा शाळांना 40 टक्के अनुदान दिले परंतु दुर्दैवाने आघाडी सरकार गेले. आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी शिंदे सरकार ला शंभर टक्के अनुदान देण्यासाठी धारेवर धरून येणारे हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृह बंद करण्याचे मी आपणा सर्वांना अभिवचन देतो. आम्ही सदैव शिक्षकांच्या पाठीशी आहोत शिक्षक म्हणजे देशाचे भवितव्य घडवणारा घटक आहे त्यांना आंदोलनाला बसावं लागत असेल तर ही खूप वाईट परिस्थिती आहे.माझ्या मतदार संघाचे अनेक शिक्षक या आंदोलनात सहभागी आहेत, ते नेहमी सक्रिय असतात असे मनोगत आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे, जहागिरदार सर, आरदवाड सर, कलवले सर, नरवटे सर आदीसह शिक्षक बांधव उपस्थित होते.
