सिध्दी शुगर कारखान्याचा गाळप हंगामाचा गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ

सिध्दी शुगर कारखान्याचा गाळप हंगामाचा गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ

अहमदपुर (गोविंद काळे) : येथील सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. महेशनगर, उजना या साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा ऊस गळीत हंगाम शुभारंभ भागवताचार्य ह.भ.प. अनंत महाराज बेलगावकर यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेबजी जाधव साहेब (माजी मंत्री.) यांच्या शुभहस्ते गव्हणीत मोळी टाकून शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठिक १०.३५वा. संपन्न झाला. यावेळी सौ. चंदाताई बाबासाहेब पाटील कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक श्री. अविनाशजी जाधव साहेब, संचालिका मा.सौ. दिपाली अविनाश जाधव, संचालक श्री. सुरज बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी श्री. शिवाजी दादाराव नरवटे, रा. राळगा, ता. अहमदपुर यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. तत्पूर्वी कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बाबासाहेबजी पाटीलसाहेब हे परदेश दौ-यावर असतानासुध्दा कॉन्फरन्सद्वारे गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी उपस्थित ऊस उत्पादक शेतक-यांना मार्गदर्शन केले व शेतक-यांना दिपवालीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या. कारखान्याचे प्रास्ताविक करताना व्यवस्थापकिय संचालक श्री. अविनाश जाधवसाहेब यांनी आपल्या भागातील शेतक-यांनी ऊस लागवडीबरोबरच दुग्ध व्यवसायाकडे वळुन स्वतःची आर्थिक उन्नती करून घ्यावी असे अवाहन केले व कामगारासाठी ८.३३ टक्के (एक महिन्याचा पगार) बोनस देण्याचे जाहीर केले. यावेळी भागवताचार्य ह.भ.प. अनंत महाराज बेलगावकर आर्शिवचन देतेवेळी सिध्दी सुगर कारखान्याची घोडदौड वर्षानुवर्ष उत्तरोत्तर प्रगती करीत असून अशीच प्रगती यापुढेही होईल असे आशीर्वाद त्यांनी यावेळी दिले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेजी जाधव साहेब अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, मागील हंगाम २०२१-२२ मध्ये ऊस उत्पादक शेतक-यास प्रती. मे.टन रु.२३५०/- भाव देण्याचे जाहीर केले होते. तसेच एफ.आर.पी. मध्ये जाहीर दरापेक्षाही वाढ झाल्यास तीही रक्कम शेतक-यांना अदा करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु एफ.आर.पी. रक्कम रु. २४३७.७६/- एवढी प्रती मे. टन आल्यामुळे पूर्ण एफ.आर.पी. प्रमाणे ऊसबिल अदा करण्यात आले. याप्रसंगी सभापती शिवानंदतात्या हंगणे, जि.प.सदस्य माधवराव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री. शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे चाकुर तालुकाध्यक्ष श्री. शिवाजीराव काळे, निवृत्ती कांबळे, एम.एस.ई.बी.चे निवृत्त चिफ इंजिनिअर श्री.बंडे साहेब, उध्दवराव इप्पर, सचिन शिवाजीराव भिकाणे, अशोक गादेवार, विजयकुमार बोडके, सुमीत वाघ, तुकाराम पाटील, सादीक शेख, शाम देवकते, दयानंद पाटील, सयद सलीम, दिलीप जाधव, अभय मिरकले, बालासाहेब पाटील आंबेगावकर, प्रशांत भोसले,बापुराव सारोळे, बाबुलाल येरमे, टी.एन. कांबळे, व्यंकट वंगे,शिवशंकर आगलावे, कमलाकर शेकापुरे, गिरीधर पौल, अशोक मोरे, गोपाळ जरे, उत्तमराव कदम, बाळासाहेब पाटील झरिकर, पुरुषोत्तम पुरोहीत, उत्तमराव देशमुख, अनील बेंबडे, रमेश पाटील, श्री. अविनाश देशमुख, बळी राम माकणे, शेषेराव चावरे, गोपाळ कानवटे, व्यंकट जांभळदरे, तानाजी राजे, संदीप शिंदे, गजानन पवार व अहमदपुर चाकुर, उदगीर लोहा, पालम, गंगाखेड जळकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट .पी.जी. होनराव, जनरल मैनेजर एस. आर. पिसाळ, जनरल मैनेजर (टेक.) बी.के. कावलगुडेकर, जनरल मैनेजर (केन.) श्री.पी.एल. मिटकर, चिफ अकाऊंटंट. एल. आर. पाटील, चिफ फायनान्स ऑफिसर श्री. ए. एस. पाटील, ऊस विकास अधिकारी .वाय.आर. टाळे, ऊस पुरवठा अधिकारी श्री. व्ही.के येदले, टेक्निकल अडवायझर श्री. सोमवंशी साहेब आदी अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक सुरज बाबासाहेब पाटील यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!