शिवशाही उदगीर-पुणे एसटी बसचे शुभारंभ १४ ऑक्टोबर रोजी माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न होणार
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर ते पुणे एसटी बसचा शुभारंभ माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आमदार संजयजी बनसोडे साहेब .यांच्या हस्ते उदगीर आगारात १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार असून,या कार्यक्रमास विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उदगीर ते पुणे शिवशाही एसटी बस या सेवेचा जास्तीत जास्त उदगीर तालुक्यातील प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आव्हान आगार व्यवस्थापक श्री यशवंत कानतोडे, स्थानक प्रमुख श्री अनिल पळनाटे, व वाहतूक नियंत्रक श्री सचीन उर्फ बालाजी पटवारी यांनी प्रवाशांना केले आहे.
