शिवाजी महाविद्यालयाचे युवक महोत्सवात यश

शिवाजी महाविद्यालयाचे युवक महोत्सवात यश

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे आयोजित राष्ट्र चेतना 2022 युवक महोत्सवामध्ये शिवाजी महाविद्यालय उदगीरच्या पथकाने राजस्थानी चिरमी नृत्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला . त्यावेळी त्यांना स्वरूप स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .त्यांची गायक सूर्यवंशी स्नेहा गुणवंत, किरण ,वादक- मनोज झुंगा, धम्मा टिगोटे यांनी अतिशय परिश्रम करून तयारी करून घेतली.या चिरमी नृत्यामध्ये अपेक्षा गुरुडे, शेळके राणी, हरकरे सुजाता, पाटील कामाक्षी, प्रतिक्षा बुंदराळे, बोईले सावली, सूर्यवंशी दिव्या, कांबळे निवेदिता, सानिका अनंतवाळ आणि पाटील समीक्षा यांनी परिश्रम करून महाविद्यालयाला हा सन्मान मिळवून दिला . संघ व्यवस्थापक प्रा. प्रशांत माने यांनी या समूहाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
अतिशय परिश्रम करून त्यांची तयारी करून घेतली. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील ,सचिव ज्ञानदेव झोडगे कोषाध्यक्ष चामले नामदेवराव व सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव ,उपप्राचार्य डॉ. एस व्ही जगताप,उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन्मान मिळवून दिलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!