धन्यवाद मोदीजी अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे – आ.कराड

धन्यवाद मोदीजी अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे - आ.कराड

लातूर (एल.पी.उगीले) : प्रदेश भाजपाच्या सूचनेनुसार केंद्र शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्याकडून योजना मिळाल्याबद्दल “धन्यवाद …..मोदीजी” अशा आशयाचे पोस्ट कार्ड देशाचे प्रधानमंत्री ना. नरेंद्रजी मोदी यांना पाठवण्यासाठी लिहून घ्यावेत, आणि हे अभियान राज्यात सर्वप्रथम लातूर जिल्ह्यात यशस्वी करावे. असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रमेशआप्पा कराड यांनी भाजपाच्या बैठकीत केले.
गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या, शोषित व पीडित, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या आणि गरजूंच्या प्रगतीसाठी व कल्याणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना सुरू करून त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला. विविध योजनेचा ज्यांना ज्यांना लाभ मिळाला, अशा लाभार्थ्यांशी गावा गावात, वाडी, तांड्यात जाऊन संपर्क साधून त्यांच्याकडून त्यांच्याच भाषेत धन्यवाद मोदीजी पोस्ट कार्ड लिहून घेऊन पंतप्रधानांना पाठवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे अभियान भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अभियान संयोजकांनी यशस्वी करावे. असे आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
धन्यवाद मोदीजी अभियाना संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत प्रारंभी जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी आ. कराड यांच्या हस्ते पोस्ट कार्डाचे मंडल निहाय वितरण करण्यात आले. यावेळी धन्यवाद मोदीजी अभियानाचे जिल्हा संयोजक शंकर रोडगे यांच्यासह जिल्हाभरातील मंडल अध्यक्ष, मंडल संयोजक , सहसंयोजक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!