18 व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

18 व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित “18 वे अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हासचे प्रकाशन” आज अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक गोविंद काळे, देवेंद्र औटी, रमेश खाडे, रामप्रभू माने, डाॅ. महादेव रायभान, साहित्य परिषदॆचे प्रदेश संघटक अमोल कुंभार उपस्थित होते. सुप्रसिद्ध साहित्यिक सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली 20 आॅक्टोबर 2022 रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहात हे संमेलन संपन्न होणार आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय खजिनदार फुलचंद नागटिळक व जिल्हा अध्यक्ष प्रा. पंडितराव लोहकरे हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत. या साहित्य संमेलनात राज्य भरातून मोठ्या संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

About The Author

error: Content is protected !!