ठाकरे साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ करेन – कैलास पाटील

ठाकरे साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ करेन - कैलास पाटील

उदगीर (एल. पी. उगिले) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे सर्वेसर्वा ठाकरे साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून शिवसेनेचे एक निष्ठेने काम यापूर्वीही केले आहे, भविष्यातही करेन. असा विश्वास शिवसेनेचे नूतन उदगीर तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय घडामोडीच्या दरम्यान पक्ष संघटनेमध्ये अधून मधून खांदेपालट होत असतात तशा पद्धतीने संघटनेने काही प्रमाणात बदल करून, उदगीर तालुका प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आहे. तर उदगीर विधानसभा मतदार संघासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून अंकुशराव कोनाळे, तालुका संघटक म्हणून बालाजी पुरी, शहर प्रमुख म्हणून प्रदीप उर्फ मुन्ना पांचाळ, शहर संघटक म्हणून संजय मठपती यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच जिल्हा संघटक म्हणून गजानन होनराव यांच्यावर उदगीर, अहमदपूर, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे.
ही नवी टीम नव्या जोमाने आणि निष्ठेने काम करेल, सध्या पुन्हा नव्याने शिवसेनेची पाळीमुळे आणखी मजबूत करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेमध्ये पडलेली उभी फुट लातूर जिल्ह्यात तरी कुठेही जाणवत नाही, जे बोटावर मोजन्या इतके शिवसैनिक बाजूला गेले आहेत. त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. असाही विश्वास याप्रसंगी कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लातूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये महा विकास आघाडी एकोप्याने काम करून सर्व जागावर आपला ध्यज फडकवले, असा विश्वासही कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना संपूर्ण ताकतीने मैदानात काम करेल आणि आपले वेगळेपण शिवसैनिक दाखवून देतील. असाही विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये अंधेरी भागात कामाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील हजारो लोक गेले आहेत. आणि ते तिथेच स्थायिक झाले आहेत. त्या लोकांचा शोध घेऊन, त्या मतदारांना मशाल चिन्हावरच मतदान करायला लावण्यासाठी आपले शिवसैनिक सज्ज झाले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकून दाखवून उद्धव साहेबांचा मान आणि सन्मान महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. असेही मत याप्रसंगी कैलास पाटील यांनी बोलून दाखवले आहे. अत्यंत त्वेषाने आणि जोमाने शिवसैनिक प्रतिष्ठापनाला लावून कामाला लागले असल्याचे खात्रीही याप्रसंगी पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

About The Author

error: Content is protected !!