जळकोट तालुका संघटकपदी मुक्तेश्वर पाटील
अतनूर (एल.पी.उगीले) : येथील मुक्तेश्वर गोविंदराव येवरे-पाटील यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जळकोट तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. ही निवड माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये करण्यात आली. या निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते देण्यात आले. निवडीबद्दल शिवसेनेचे जळकोट तालुका प्रमुख मन्मथ धुळशेट्टे, जळकोट शिवसेनेचे नगरसेवक शिवलिंग धुळशेट्टे, शहरप्रमुख शंकर सोप्पा, जळकोट तालुकाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील अतनूरकर, युवासेना तालुका प्रमुख अनिल ढोबळे, बाळु धोंडीहिप्परगे, शंकर धोंडापुरे, बालाजी ठाकुर, बालाजी देवकत्ते, अंभग मोहटे, गोविंद बारसुळे, रवी पांचाळ, माधव केंद्रे, माधव सोमुसे, देविदास घोडके, संजय बाजगीरे, आकाश बेळकुंदे, विकास राठोड आदींनी अभिनंदन केले. मुक्तेश्वर पाटील म्हणाले, पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
