अंध प्रा. चव्हाण “तिसरा डोळा” व्याख्यानमालेतून डोळसांना दाखवणार दिशा
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील उदयगिरी लायन्स असोसिएशन, अरुणा अभय ओसवाल रिसर्च सेंटर फॉर ब्लाइंडस् व्ही. आय., लाइन्स क्लब उदगीर तसेच लायन्स क्लब उदगीर उमंग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक अंध दिन अर्थात पांढरी काठी दिवस च्या निमित्ताने 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत तब्बल 11 तास अंध प्रा. राजेंद्र चव्हाण हे “तिसरा डोळा” या प्रेरणादायी व्याख्यानमालेतून पन्नास विषयावर पाच सत्रामध्ये व्याख्यान देणार आहेत.
प्राध्यापक राजेंद्र चव्हाण हे अंध असून समाजातील डोळस व्यक्तिंना दिशा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्वात असल्यामुळे सदरील “तिसरा डोळा” हा प्रेरणादायी व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. आणि अंध मित्रांना प्रोत्साहन द्यावे. असेही आवाहन लॉ. डॉ. आर एन लखोटिया, लॉ. विवेक जैन, लॉ. सुभाष वाकुडे यांनी केले आहे. सदरील कार्यक्रम उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय, नांदेड नाका उदगीर या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या सामाजिक उपक्रमात संवेदनशील मनाच्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे. अशीही विनंती संयोजकाच्या वतीने करण्यात आली आहे.
