विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साह साजरा

विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साह साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलमध्ये 15 ऑक्टोबर 2022 हा दिवस डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून उत्साह साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सुप्रिया पाटील (तळेगावकर) यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक सी. व्ही पाटील, मीरा पाटील, स्मिता पाटील, शोभा पाटील, एम. एस गायकवाड, एस एच आरने यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी गुळंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. डी पटवारी यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!