नांदेड च्या एसीबी विभागने लातूर मध्ये रचला सापळा
तीन हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिक रंगेहात
लातूर (कैलास साळुंके) : लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेले प्रमोद बाबुराव सितारे (वय 40) यांनी ७ व्या आयोगाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या मंजूर झालेल्या तीन लाभा पैकी पहिल्या लाभाची रक्कम तक्रारदार पुरुष (वय 48) यांच्या खात्यावर जमा व बक्षीस मोबदला म्हणून यांनी 4000 रु. लाचेची मागणी केली होती.
तक्रार दाराने दिलेल्या तक्रारी वरुण दि. 2 मार्च रोजी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करत लाभाची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी 4000 रु लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती 3000 रुपये लाचेची मागणी स्वीकारण्याचे मान्य केले. नांदेड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचत कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड च्या कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल पखाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी तेलंगे, पोलीस नाईक गणेश तालकोकुलवार, जगन्नाथ अनंतवार, सचिन गायकवाड, शेख मुजीब व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड च्या विभागाने यशस्वी सापळा रचत ही कार्यवाही केली आहे.