दरोड्यातील आरोपींना अटक, दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 79 लाख 13 हजार 513 रुपयाचा मुद्देमाल जप्त

दरोड्यातील आरोपींना अटक, दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण 79 लाख 13 हजार 513 रुपयाचा मुद्देमाल जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीतील एका दरोड्या प्रकरणातील तपास लातूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने लावला आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा सिंहाचा वाटा आहे.

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दि.12/10/2022 रोजीच्या मध्यरात्री पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील कातपूर शिवारातील एका व्यावसायिकाच्या घरात अज्ञात आरोपींनी प्रवेश करून त्यांच्याकडील अग्निशस्त्र व चाकूचा धाक दाखवून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण लाख 2 कोटी 98 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेले आहे. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुरनं 589/22 कलम 395, 397 भारतीय दंड विधान संहिता तसेच कलम 25, 3, 4 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे दिनांक 12/10/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महत्त्वाच्या सूचना करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, तर विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते.

सदरच्या पथकांना मार्गदर्शन व सूचना देऊन दरोड्याचे गुन्हे करण्याच्या सवयीचे असलेल्या व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता वेगवेगळ्या दिशेने तपास पथके रवाना करण्यात आली होती.

नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना सदर पथकांनी मोठ्या प्रमाणात गोपनीय बातमीदारांना नेमून त्यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेत होते. दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कातपूर शिवारातील अग्रवाल यांच्या घरी चोरी मधील संशयित आरोपी हा पांचपीर नगर बाभळगाव रोड, लातूर येथे वास्तव्यास आहे.

अशी माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ नमूद ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे किशोर घनगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की, पुणे येथे राहणारा टक्कूसिंग कल्याणी व त्याच्या साथीदारासोबत मिळून घातक हत्यारांचा धाक दाखवून सदरची चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून नमूद पथकांनी पुणे येथून व विविध ठिकाणाहून खालील नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम 50 लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा जवळपास 29 लाख रुपयांचे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा व मुद्देमालांचा शोध घेण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.

गुन्हण्यातील आरोपी नावे, टक्कूसिंग अजित सिंग कल्याणी, (वय 50, वर्ष रामटेकडी पुणे), किशोर नारायण घनगाव, (वय 38 वर्ष, राहणार पांचपीर नगर, बाभळगाव रोड, लातूर.),बल्लूसिंग अमरसिंग टाक, (वय 30 वर्ष ,राहणार तीर्थपुरी तालुका घनसांगवी जिल्हा जालना.), गणेश कोंडीबा अहिरे, (वय 30 वर्ष, राहणार बावची तालुका रेणापूर.), अशांना वेगवेगळ्या ठिकाणाहून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शनात नमूद पथकांनी सदर दरोड्याच्या गुन्ह्याचा अतिशय जलद गतीने व कौशल्य पूर्वक तपास करून अवघ्या 10 दिवसात गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर ,पोलीस निरीक्षक (सायबर) अशोक बेले, सहायक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, सचिन द्रोणाचार्य, भाऊसाहेब खंदारे, सुरज गायकवाड, सावंत, फिंगरप्रिंटचे माळवदकर पोलिस उपनिरीक्षक महेश गळघट्टे, शैलेश जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे ,राम गवारे, रवी गोंदकर, खुर्रम काझी, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ हासबे ,यशपाल कांबळे, राजेश कंचे ,माधव बिलापट्टे ,सुधीर कोळसुरे सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, रियाज सौदागर,राजू मस्के,तुराब पठाण, जमीर शेख,नितीन कटारे ,प्रदीप चोपणे ,नकुल पाटील, युसुफ शेख ,बेल्हाळे, गोविंद भोसले, विनोद चालवाड, मुन्ना पठाण ,अर्जुन राजपूत , गोविंद चामे, युवराज गिरी, महेश पारडे, दीनानाथ देवकते, संतोष खांडेकर, संतोष देवडे ,प्रदीप स्वामी, गणेश साठे, शैलेश सुडे,अंजली गायकवाड यांनी केली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!