उदगीरात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पालखी सोहळा

उदगीरात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पालखी सोहळा

उदगीर (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र जय वीर हनुमान मंदिर बिदर उदगीर यांच्यावतीने श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पुण्यतिथीनिमित्त उदगीर शहरातील विविध नगरातून, मुख्य रस्त्यावरून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळा सकाळी ठीक 11.00 वाजता घरकुल मंगल कार्यालयासमोरील जय विर हनुमान मंदिर बिदर रोड उदगीर येथून संत ज्ञानेश्वर शाळा, सिग्नल नंबर दोन, अश्विनी हॉस्पिटल, सुवर्णमाता कन्या विद्यालय उदगीर, चांभार सोसायटी, शिवाजी चौक, बस स्टॅन्ड, दूध डेरी मार्ग रघुकुल मंगल कार्यालय पालखी सोहळ्याचा मार्ग असणार आहे. या प्रसंगी त्रिकाल आरती सकाळी 8.00 सकाळी 10.30, सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होणार आहे. तरी या पालखी सोहळ्याचा व त्रिकाल आरतीचा उदगीर शहरातील, परिसरातील,तालुक्यातील,सेवेकरी कार्यरत सेवेकरी भाविक – भक्त या सोळास उपस्थित राहावे असे आवाहन समर्थ सेविक्री यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!