जकनाळला विकासाची गंगा खेचून आणणारा नेता आ.बनसोडे – रामेश्वर बिरादार जकनाळकर

जकनाळला विकासाची गंगा खेचून आणणारा नेता आ.बनसोडे - रामेश्वर बिरादार जकनाळकर

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील जकनाळ या छोट्याशा गावात प्रत्यक्ष विकासाची गंगा खेचून आणून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीपेक्षा अधिक विकास निधी उदगीरचे कार्यसम्राट आमदार संजय बनसोडे यांनी दिला आहे. एका अर्थाने संपूर्ण उदगीर विधानसभा मतदारसंघात विकासासाठी जवळपास 1700 कोटी रुपये विकास निधी खेचून आणला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव, शहर तसेच अनेक वाडी, तांड्यावर देखील विकासाचा निधी देणारा हा पहिला आमदार पाहिल्याचे रामेश्वर बिराजदार जकनाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

गावातील पाणीटंचाईचा विचार करून सार्वजनिक विहिरीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केलेले पाणीपुरवठा केला जावा. या उद्देशाने पाच लाखाचा जलनिधी त्यांनी मंजूर केला. आता या सार्वजनिक विहिरीचे काम चालू आहे, तसेच मूलभूत विकास योजनेअंतर्गत वीस लाख रुपये विकास निधी दिला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 58 लाख रुपये मंजूर करून या योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या टाकीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

आमदार संजय बनसोडे यांनी गेल्या वर्षी समशानभूमीला जाण्यासाठीचा रस्ता हवा म्हणून सहा लाख रुपये दिले होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. मूलभूत सुविधेतून गेल्यावर्षी दहा लाख रुपये दिले होते. त्याचेही काम पूर्ण झाले आहे. मातोश्री योजनेतून आठ किलोमीटरचा रस्त्याच्या कामाला मंजुरी दिलेली असून दोन किलोमीटर पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. छोट्याशा गावातही विकासाची गंगा आली पाहिजे असा उदात्ते हेतू ठेवून जकनाळ येथे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी पहिल्यांदाच आला असल्याचे ग्रामस्थ सांगत असल्याचेही रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

अत्यंत दर्जेदार पद्धतीने कामे झाली पाहिजेत. असा त्यांचा अट्टाहास असतो, गावात जाणारा रस्ता आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीचे काम झाले पाहिजे. गावात स्वच्छता असली पाहिजे. या दृष्टीने विशेष लक्ष देऊन नागरी सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असणारा विकास निधी आमदार म्हणून संजय बनसोडे यांनी जकनाळ या गावाला दिला आहे. भविष्यात देखील वेगवेगळ्या योजनेअंतर्गत ग्रामविकासासाठी आपण सदैव सहकार्य करू, असेही आश्वासन आमदार संजय बनसोडे यांनी दिले आहे.

आमदार संजय बनसोडे म्हणजे विकासाची गंगा खेचून आणणारा भगीरथच ! अशी भावना ग्रामीण जनतेची झाली आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात आमदार संजय बनसोडे यांना साहेब किंवा आमदार असे न म्हणता प्रत्येक माणूस त्यांना “भाऊ” असे संबोधतो. अत्यंत नम्र स्वभाव, विकासाची दूरदृष्टी यामुळे आमदार संजयभाऊ बनसोडे यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे असे म्हटले तर नवल वाटू नये, अशी ही माहिती याप्रसंगी रामेश्वर बिरादार जकनाळकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. ग्रामीण विकासाची नाळ जोडणारा हा लोकनेता खरोखर सतत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. सर्व धर्म समभाव आणि सर्व माणसाबद्दल आदरभाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भावना उल्लेखनीय असल्याचेही रामेश्वर बिराजदार यांनी सांगितले.

About The Author